सराफी व्यावसायिकाची फसवणुक करणाऱ्यास कोल्हापुर येथील एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

सराफी व्यावसायिकाकडून विक्रीसाठी घेतलेले दोन कोटी वीस लाख रुपयांचे दागिने परत न करता फसवणुक केल्याप्रकरणी कोल्हापुर येथील एका नागरीकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला होता.

पुणे - सराफी व्यावसायिकाकडून विक्रीसाठी घेतलेले दोन कोटी वीस लाख रुपयांचे दागिने परत न करता फसवणुक केल्याप्रकरणी कोल्हापुर येथील एका नागरीकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आनंद सुरेश गुंदेशा (वय 42, रा. प्रार्थना अपार्टमेंट, भक्ती पूजा नगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सराफी व्यावसायिक देबू मजुमदार (वय 48, रा. सोमवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुमदार यांचे बुधवार पेठेतील कातील कुटे इमारतीमध्ये सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. सराफ बाजारातील दुकानातून ते कमी कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची (टेंपल ज्वेलरी) विक्री करतात. त्यानुसार, गुंदेशा हे त्यांच्याकडून हे दागिने घेऊन कोल्हापूर, सांगली परिसरातील सराफी व्यावसायिकांना विक्री करीत होता. या कामासाठी मजुमदार हे गुंदेशाला टक्केवारीनुसार पैसे देत होते.

स्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का ? विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्‍न

गुंदेशा याने फिर्यादी मजुमदार यांच्याकडून जानेवारी महिन्यात दागिने घेतले होते. त्यापैकी काही दागिन्यांची त्याने विक्री केली. तर उर्वरीत दोन कोटी 20 लाख 17 हजार 440 रुपये किंमतीचे व पाच किलो 899 ग्रॅम वजनाचे दागिने परत केले नाहीत. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या कालावधीमध्येही मजुमदार यांनी गुंदेशा याच्याशी सातत्याने संपर्क ठेवून त्याच्याकडे दागिने परत देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र गुंदेशा याने मजुमदार यांना प्रतिसाद दिला नाही.

सर्व अभ्यासक्रमांसाठी हवा एकच नियम कारण...

अखेर मजुमदार यांनी गुंदेशाने दागिने परत न केल्यामुळे त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शानखाली पोलिस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी व त्यांच्या पथकाने गुंदेशाला कोल्हापुर येथील त्याच्या राहत्या घरातुन अटक केली. मजुमदार यांच्याप्रमाणेच गुंदेशा याने आणखी काही सराफी व्यावसायिकांची फसवणूक केल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत. न्यायालयाने गुंदेशाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested in Kolhapur for cheating goldsmith