नोबेल हॉस्पिटल उडविण्याची धमकी देण्यामागे 'हे' आहे कारण

One arrested for threatening for bomb blast in Noble Hospital
One arrested for threatening for bomb blast in Noble Hospital

पुणे : दहा लाख रुपयांची खंडणी न दिल्यास नोबल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देऊ, अशी ई-मेलद्वारे धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला सायबर गुन्हे शाखेने अटक केली. प्रविण हिराचंद कुंभार (वय 31, रा. पाफळे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोबाईल, सिमकार्ड, लॅपटॉप आणि टॅब जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्‍तीने 31 जानेवारीला ई-मेल पाठवून नोबल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. तसेच, दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. तसेच, दुसऱ्यांदा 7 फेब्रुवारीला पुन्हा ई-मेल करून धमकी दिली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापन आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. 

आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !

तपासादरम्यान, आरोपीने पाठवलेल्या ई-मेल आयडीचे कंपनीकडून तांत्रिक विश्‍लेषण करून घेण्यात आले. त्यात आरोपीने ई-मेल पाठविण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून वेगवेगळ्या व्यक्‍तींच्या इंटरनेट वाय फायचा वापर केल्याचे आढळून आले.
 

नोकरी टिकत नसल्याने नैराश्यग्रस्त तरुणाने दिली ही धमकी   
संशयित आरोपी प्रविण कुंभार उच्चशिक्षित असून, एम.एस्सी. फिजिक्‍स उत्तीर्ण आहे. तो विवाहित असून, काही खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली आहे. परंतु तो कोठे टिकला नाही. सध्या नोकरी मिळत नसल्यामुळे नैराश्यग्रस्त होऊन ही धमकी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com