सिगारेटचे पैसे मागितले म्हणून एकास लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खांदवे यांची लोहगावमधील आझाद चौकामध्ये पानटपरी आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता ते त्यांची टपरी बंद करून घरी निघाले होते. त्यावेळी त्यावेळी तेथे आलेल्या एकाने त्यास सिगारेट मागितली. त्यानंतर फिर्यादींनी टपरी पुन्हा उघडून त्यास सिगारेट देत त्याचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस टपरीतून बाहेर ओढून दमदाटी करीत शिवीगाळ केली.

पुणे : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन टोळक्‍याने पानटपरी चालकास लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता लोहगावमध्ये घडली. याप्रकरणी ओंकार खांदवे (वय 24, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एल्गारची सुनावणी कुठे होणार ? सहा फेब्रुवारीला निकाल
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खांदवे यांची लोहगावमधील आझाद चौकामध्ये पानटपरी आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता ते त्यांची टपरी बंद करून घरी निघाले होते. त्यावेळी त्यावेळी तेथे आलेल्या एकाने त्यास सिगारेट मागितली. त्यानंतर फिर्यादींनी टपरी पुन्हा उघडून त्यास सिगारेट देत त्याचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस टपरीतून बाहेर ओढून दमदाटी करीत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे फिर्यादी घाबरून पळून जाऊ लागले. त्यावेळी आरोपीच्या अन्य सहा ते सात साथीदारांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्यांना लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली.

मैलापाण्यात काम करणारे घेणार मोकळा श्वास कारण...

दरम्यान, फिर्यादीच्या बहिणीने हा प्रकार पाहीला. त्यानंतर त्या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांनाही टोळक्‍याने धक्काबुक्की केली याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर अधिक तपास करीत आहे. 

इस्रोच्या वैज्ञानिकांसह उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याची आहे? मग 'ही' बातमी वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One beaten up for demanding cigarette money pune