एल्गारची सुनावणी कुठे होणार ? सहा फेब्रुवारीला निकाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामूळे एनआयएच्या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली.

पुणे : एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरनाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत याचा फैसला सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे .एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर म्हणणं मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी बचाव पक्षांकडुन सोमवारी करण्यात आली. 

पुण्यातील 'या' 7 तालुक्यात अजुनही मुलगी 'नकोशी'च

या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामूळे एनआयएच्या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केली. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. त्याच दिवशी दोन्ही पक्ष आपले म्हणणे सादर करणार असून न्यायालय त्यावर निकाल देणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत हे  6 फेब्रुवारीला निश्चित होणार आहे. 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...
 

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपास अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयात अर्ज करत या प्रकरणाचे कागदपत्र पुरविण्यात यावे. तसेच यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवण्यात यावा व त्यासाठी कागदपत्रे तिकडे पाठवावीत, असा अर्ज न्यायालयात केला आहे. 

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Result on 6th February about where Elgar's hearing will be held