पुणे - ‘नमस्कार मॅडम, मी बँकेतून बोलतोय. तुमचा धनादेश वटलेला नाही. कृपया फाइल डाऊनलोड करून अर्ज भरा, म्हणजे लगेच प्रक्रिया पूर्ण होईल,’ असे सांगत अनोळखी व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्याने दिलेली एपीके फाइल महिलेने मोबाईलवर डाऊनलोड केली. काही वेळातच बँक खात्यातून एकामागून एक पैसे जात असल्याचे संदेश यायला लागले आणि संपूर्ण बॅंक खातेच रिकामे झाले.