धानोरीतील खाणीत एकाची आत्महत्या

धानोरी मार्गावरील असणाऱ्या खाणीत अज्ञात व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना
One commits suicide in Dhanori mine pune
One commits suicide in Dhanori mine punecrime news

विश्रांतवाडी : धानोरी मार्गावरील असणाऱ्या खाणीत अज्ञात व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धानोरी मार्गावरील अंबानगरी सोसायटीलगतच असलेल्या पाण्याच्या खाणीत दुपारी अंदाजे १ते २च्या दरम्यान संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली. खाणीजवळच मयत व्यक्तीची दुचाकी व पायातील चप्पल आढळून आली असून या ठिकाणी व्यक्तीने उडी घेतली की पाय घसरून पडला याचे अद्याप स्पष्टीकरण झाले नसून या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.

घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेखर खराडे,प्रफुल्ल मोरे,संदीप देवकाते,संपत मोरे व सहायक पोलीस निरीक्षक शरद माळी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. संध्याकाळपर्यंत मयताच्या कोणत्याही नातेवाईकाने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली नव्हती. यावेळी परिसरात नागरिकांची बघ्याची गर्दी जमल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले. पुढील समस्या लक्षात घेऊन पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com