देवस्थानांकडून ससूनकडे मदतीचा ओघ सुरू; तीन दिवसांत एक कोटीहून अधिक निधी प्राप्त

sasoon-hospital
sasoon-hospital

पुणे - धर्मादाय सहआयुक्त यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे विभागातील देवस्थानांच्या विश्वस्तांनी ससून रुग्णालयाला मदतीचा हात पुढे केला आहे. गेल्या तीन दिवसांत देवस्थानच्या विश्वस्तांकडून एक कोटीहून अधिक निधी ससून रुग्णालयाला प्राप्त झाला आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ससून रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांची गरज भासणार आहे. त्यासाठी धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी पुणे विभागातील सर्वधर्मीय देवस्थानांच्या विश्वस्तांना आणि शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्तांना ससून रुग्णालयाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांनी 51 लाख रुपये तर, शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी 12 लाख रुपये किमतीचे वेंटिलेटर उपलब्ध करून दिले. 

यानंतर गोंदवलेकर महाराज देवस्थान यांच्यावतीने 25 लाख रुपये, चिंचवड देवस्थानच्या वतीने 21 लाख रुपये, शंकर महाराज मठ, पुणे यांच्या वतीने पाच लाख रुपये, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये ससून रूग्णालयाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त सोलापूर येथील बाहेती यांनी सुमारे दहा लाख रुपये किमतीचे सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच आणखी धर्मादाय संस्थांकडून ससून रुग्णालयाला आर्थिक मदत करण्यात येत आहे.

ससून रुग्णालयास सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणे विभागातील देवस्थानांच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळत आहे. या सर्व विश्वस्तांचे आभार व्यक्त करतो. इतर देवस्थान आणि शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्तांनीही अशा संकटप्रसंगी पुढे यावे.
- दिलीप देशमुख, धर्मादाय सहआयुक्त पुणे विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com