accident compensation
sakal
पुणे - रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकास मध्यस्थीमार्फत तब्बल एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. २०२२ मध्ये घडलेल्या अपघातानंतर जखमी झालेल्या दुचाकी चालकास दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले, तसेच ७८ टक्के अपंगत्व आले. त्यामुळे न्यायालयीन वाद न वाढविता हा वाद मध्यस्थीच्या मार्गाने निकाली निघाला.