पुण्यात मैत्रिणीच्या किंचाळीने झाला मैत्रिचा शेवट...

Pooja Chavan
Pooja Chavan

लोणी काळभोर : मोटारसायकल चालवत असतांना मोबाईलवर बोलणे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील दोन मैत्रीनींना चांगलेच महागात पडले आहे. पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट नाक्यावर मोटारसायकलला डिझेलची वहातुक करणाऱ्या भऱधाव टॅकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात, एका मैत्रिणिला आपला जीव गमवावा लागला तर दुसरी मैत्रिण जखमी झाली आहे. 

पूजा प्रकाश चव्हाण (वय- 32, रा. बालाजी टॉवर, कवडीपाट टोलनाक्याजनऴ, कदमवाकवस्ती ता. हवेली, मुळगाव- हंचीनाळ, बेळगाव-कर्नाटक) या अपघातात जागीच ठार झालेल्या मैत्रीनीचे नाव असुन, त्यांची मैत्रीन शितल सचिन शेंडगे (वय- 32, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) या जखमी किरकोळ झाल्या आहेत. हा अपघात  मंगळवारी (ता. 17) सकाळी दहा वाजनेच्या सुमारास झाला. दरम्यान शितल शेंडगे यांच्यावर कदमवाकवस्ती येथील एका खाजगी रुग्नालयात उपचार चालु असुन, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण व शितल शेंडगे या दोघींची मुले कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असल्याने, मागिल कांही वर्षापासुन दोघींची मैत्री होती. एंजल हायस्कुलमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजनेच्या सुमारास पालक सभा असल्याने, पावने दहा वाजनेच्या सुमारास पुजा चव्हाण व शितल शेंडगे या दोघीं मोटार सायकलवरुन शाळेत निघाल्या होत्या. शितल शेंडगे या मोटार सायकल चालवत होत्या तर पुजा चव्हाण या मागे बसल्या होत्या. मोटार सायकलवरुन दोघीजणी कवडीमाळवाडी बाजुकडुन येणाऱ्या रस्तावरुन मुख्य पुणे-सोलापुर महामार्गावर आल्या असता, त्याचवेळी शेंडगे या फोनवर बोलण्याचा प्रयत्न करु लागल्या. दरम्यान कवडीपाट टोलनाक्यातुन बाहेर पडलेल्या डिझेलच्या टँकरने मोटारसायकलला शेंडगे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात शेंडगे डाव्या बाजुला पडल्या तर पुजा चव्हाण उजव्या बाजुला पडल्या. त्याचवेळी टॅकरचे पुढील चालक पुजा चव्हाण यांच्या छातीवरुन गेले. यात पुजा गंभीर जखमी झाल्या. 

दरम्यान शितल शेंडगे व पूजा चव्हाण जखमी झाल्याचे लक्षात येताच, टोलनाक्यावरील स्थानिक नागरीकांनी दोघीनांही पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्नालयात नेले. मात्र उपचार सुरु करण्यापुर्वीच पूजा चव्हाण यांचा मृत्यु झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पूजा चव्हाण यांचे पती, प्रकाश महादेव चव्हाण हे विज वितरण कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आहेत. पूजा चव्हाण यांना दोन लहाण मुले आहेत. विशेष बाब म्हणजे पूजा या मोटार सायकलवररुन प्रवास करण्यात भित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com