राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात ‘एनआयव्‍ही’चे सर्वेक्षण

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात
‘एनआयव्‍ही’चे सर्वेक्षण
Published on: 

पुणे, ता. ७ : प्राणी आणि मानव यांच्या आरोग्याचा परस्परसंबंध लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या ‘वन हेल्थ’ सर्वेक्षणांतर्गत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्रात पाहणी केली. या उपक्रमांतर्गत प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा (झुनोटिक डिसीज) अभ्यास आणि त्यांचे निरीक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे.
या सर्वेक्षणासाठी ५ नोव्हेंबर रोजी ‘एनआयव्ही’सह विविध संस्थांच्या पथकाने प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. तेथे आयोजित कार्यशाळेनंतर पथकाने प्राणिसंग्रहालयातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या उपक्रमात भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि नागपूर येथील ‘राष्ट्रीय वन हेल्थ’ संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘एनआयव्‍ही’ ही प्राण्यांपासून मानवांमध्ये संसर्ग होऊ शकणाऱ्या संसर्गजन्‍य आजारांचा अभ्‍यास करत आहे. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील काळजीवाहू कर्मचारी हे सातत्‍याने प्राण्यांच्या संपर्कात असतात. मात्र, प्राण्यांना एखादा आजार झाल्‍यास तो त्‍यांच्‍या संपर्कात असलेल्‍या कर्मचाऱ्यांच्या माध्‍यमातून समाजामध्‍ये पसरू शकतो. त्‍याला वेळीच अटकाव व्‍हावा, या दृष्टीने ही तपासणी करण्यात आली आहे.
मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा एकत्रित विचार करून संसर्गजन्य आजारांचा धोका वेळीच ओळखणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी उपाययोजना करणे हा ‘वन हेल्थ’ संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.
.............
फोटो ः 64930

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.