झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पुणे : झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील समर्थनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये मंगळवारी (ता. 4) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रामदास दगडू वाघमारे (वय 45, रा. म्हाडा कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीराम दगडू वाघमारे (वय 55, रा. शिराढोण, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक बाबूराव देवडे (वय 76, रा. बिल्डिंग क्र. सहा, म्हाडा कॉलनी, हडपसर) याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास वाघमारे हे फिर्यादींचे लहान भाऊ होते. म्हाडा कॉलनीमध्ये समर्थनगर भागात मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड आहे. रात्रीच्या वेळी परिसरातील लोक त्या शेडमध्ये जाऊन झोपतात. झोपण्यासाठी जागा देण्यावरून दोन दिवसापूर्वी रामदास वाघमारे आणि देवडे यांच्यात भांडणे झाली होती. त्याचा राग मनात देवडे याच्या मनात होता. त्यामुळे घटनेच्या दिवशी रामदास हे गाढ झोपेत असताना देवडे याने त्यांच्या डोक्‍यात दगड घालून खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in a dispute over a sleeping place In Pune