चाकण - खराबवाडी (ता. खेड) येथील सारा सिटी रस्त्यावरील ‘ऐश्वर्या हॉटेल’ मध्ये शुक्रवारी (ता. ७) दोन आचाऱ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. यात विजय विनायक पांचाळे (वय ३८, मूळ रा. अमरावती) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी उदयप्रकाश महेंद्र गिरी (वय ३५, सध्या रा. खराबवाडी; मूळ रा. जमगई पोस्ट-मोडीलाडी सोनभद्री, उत्तर प्रदेश) या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम व त्यांच्या पथकाने अटक केली.