गुळंचवाडी येथे अपघातात एक ठार, दोन जण जखमी | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळंचवाडी येथे अपघातात एक ठार, दोन जण जखमी
गुळंचवाडी येथे अपघातात एक ठार, दोन जण जखमी

पुणे : गुळंचवाडी येथे अपघातात एक ठार, दोन जण जखमी

sakal_logo
By
Print

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता. १९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा मोटार व ट्रॅक्टरच्या अपघातात इनोव्हातील एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
गुळंचवाडी शिवारातून उसाने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच १६ केव्ही ६४८६) विना क्रमांकाच्या दोन ट्रॉली घेऊन जात होता. त्याच दरम्यान रस्त्यावरून जाणारी इनोव्हा मोटार (क्र. एमएच १९ एपी ८०१०) ट्रॉलीला पाठीमागून जाऊन धडकली.

हेही वाचा: नगरमध्ये दोन वनाधिकारी लाच घेताना पकडले

जोरदार धडक बसल्याने मोटारीचा चक्काचूर झाला. या अपघातात मोटारीतील संजय मारुती गगे (वय ५०, रा. नळावणे, ता. जुन्नर) हे ठार झाले असून, योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे (दोघेही रा. नळवणे) हे गंभीर जखमी झाले.
अपघात एवढा भीषण होता की, मोटारीमधील संजय गगे हे जागीच ठार झाले. उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी इनोव्हा चालक राहुल भास्कर हाडवळे यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top