पुणे : पोलिसांनी दरवाजा उघडला तर, ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात

one Murder in Bopodi and The attacker was seriously injured
one Murder in Bopodi and The attacker was seriously injured
Updated on

पुणे : बोपोडी येथील एका बहुमजली इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकांवर दुसऱ्या व्यक्तीने चाकून वार केला. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांनी तेथील घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन पोलिसांना बोलाविले. दरम्यान, पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर चाकूने वार केल्यामुळे जबर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर हल्ला करणाराही अत्यवस्थ असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पिंपरीत टेम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू 

बाळकृष्ण नरसू (रा. जळगाव) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर तायडे असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील कुंदन कुशल या इमारतीमध्ये बाळकृष्ण नरसू हा राहात होता. मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास जळगाव येथे राहणारा तायडे हा त्याच्या फ्लॅटमध्ये आला. तायडेने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने नरसूवर वार केले. त्यावेळी नरसूनेही झटापटीमध्ये तायडेचा प्रतिकार करताना त्याला जखमी केले. या घटनेमुळे घाबरलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी संबंधीत फ्लॅट बंद करुन पोलिसांना बोलाविले.

पुण्यात मैत्रिणीच्या किंचाळीने झाला मैत्रिचा शेवट..

पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर दोघेही गंभीर जखमी होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर नरसू याचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तर तायडे हा गंभीर जखमी झाल्याने अत्यस्थ असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तायडे याने कोणत्या कारणामुळे हा हल्ला केला, याचा शोध पोलिस घेत आहे. दरम्यान, दोघेही जण अन्य कोणाच्याही ओळखीचे नसल्याने पोलिसांना या घटनेचे कारण शोधण्यात अडचण येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com