चिंचवडमध्ये कोयत्याने वार करुन तरुणाचा खून 

संदीप घिसे 
बुधवार, 30 मे 2018

पिंपरी (पुणे) - येथे कोयत्याने वार करीत व डोक्यात कुंडी घालून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (२९) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली.

आकाश तानाजी लांडगे (वय २४, पागेची तालीम, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रणजित बाबू चव्हाण (वय २३, वेताळनगर, चिंचवडगाव), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय २३, रा भोई आळी, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढाकणे, सोन्या वराडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत ज्ञानोबा वीर (वय ४४रा. चिंचवडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास आकाश लांडगे चांद शेख याच्यासोबत चिंचवडगावातील चापेकर चौक येथून चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आकाश लांडगे याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच डोक्यात कुंडी व सिमेंटच्या गट्टूने मारले. यात तो गंभीर जखमी झाला. वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू असताना पावणे तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात आरोपी रणजित चव्हाण याच्यावर आठ आणि बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

Web Title: one murdered in chinchwad pune

टॅग्स