esakal | पोलिस कमिशनर ऑफिसमध्येच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील घटना

बोलून बातमी शोधा

Crime_Suicide}

नवनाथ थोरात याच्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिस कमिशनर ऑफिसमध्येच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिसांनी खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत एकाने शनिवारी (ता.१३) सायंकाळी पाच वाजता ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. नवनाथ थोरात असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मारुती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील पोलिसाची मुंबईत आत्महत्या; स्वत:वर झाडली गोळी​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ थोरात याच्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र संबंधीत गुन्हा हा खोटा असल्याचे नवनाथचे म्हणणे होते. शनिवारी तो पोलिस अधिक्षकांना त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगणार होता. दरम्यान, तो शनिवारी सायंकाळी ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात आला. तेथे परकीय नागरीक नोंदणी विभागाच्या कार्यालयासमोरील क्वार्टर गार्डच्या भिंतीजवळील बाकड्यावर बसून विष प्राशन केले. हा प्रकार तेथे ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास तत्काळ रुग्णालयात हलविले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)