esakal | चिंकारा शिकार प्रकरणात संशयित आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

चिंकारा शिकार प्रकरणात संशयित आरोपीस अटक

- सदर आरोपीस घेण्यात आले ताब्यात.

चिंकारा शिकार प्रकरणात संशयित आरोपीस अटक

sakal_logo
By
संतोष आटोळे

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील जैनकवाडीमधील पवार वस्ती येथे सोमवार (ता.8) चिंकारा हरीणाची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र शंकर आडके (वय 48, रा. कटफळ) यास वनविभागाने काल रात्री फलटण तालुक्यातील बरड परिसरात सापळा रचून अटक केली, अशी माहिती बारामतीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

घटनास्थळी सदर संयशित आरोपी हजर होता. यासह आणखी त्याच्याबरोबर साथीदार होते का? याचा तपास केला जाणार आहे. त्यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती राहुल काळे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, श्री लक्ष्मी उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक एस पी कडू, वैभव भालेराव, बारामतीचे वनपाल टी जी जराड, वनपाल अमोल पाचपुते, वनरक्षक सागर भोसले, कवीतके यांनी तपास करून चार दिवसात आरोपीस अटक केली.