जुन्नरमधील कोरोनाबाधितांसाठी एक हजार बेडची व्यवस्था

corona1
corona1

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत तालुका प्रशासनाने लेण्याद्री व ओझर येथे एक हजार बेडची व्यवस्था केली असल्याची माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.

जुन्नरला काल २५ रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने कोरोना बधितांची संख्या १६८ झाली आहे. काल रात्री उशीरा आलेल्या अहवालातून तालुक्यात नव्याने  पिपळगाव आर्वी येथे ७, नारायणगाव येथे ५, हापूसबाग येथे १, ओझर येथे २, माणिकडोह येथे २, जुन्नर येथे २, हिवरे बुद्रुक येथे २, वारुळवाडी येथे १, औरंगपूर येथे ३, असे एकुण २५ रुग्ण वाढले. त्यामुळे उपचार घेणारे रुग्ण ९३ झाले आहेत, तर एक रुग्ण बरा झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७२ झाली आहे.मोकासबाग व पिंपळगाव-आर्वी येथील प्रत्येकी एक, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धनगरवाडी, धालेवाडीतर्फे हवेली, जुन्नर, वारुळवाडी, नारायणगाव व पिंपळगावतर्फे आर्वी येथे पाचपेक्षा अधिक रुग्ण आहेत. आजपर्यंत १३९५ संशयित कोरोना रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आज ६१ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. बाहेरून आलेल्या ३५६२ जणांपैकी २५ संस्थात्मक, तर  ३५४० होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com