शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी एक हजार किलोमीटरची ड्रोनयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drone yatra

शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढावी म्हणून, सिंजेंटा इंडियाच्या वतीने एक हजार किलोमीटरची ‘ड्रोनयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी एक हजार किलोमीटरची ड्रोनयात्रा

पुणे - शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढावी म्हणून, सिंजेंटा इंडियाच्या वतीने एक हजार किलोमीटरची ‘ड्रोनयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. १३ राज्यातून जाणाऱ्या या ड्रोनयात्रेला शुक्रवारी पुण्यातील कंपनीच्या कार्यालयापासून सुरवात झाली. सर्वात प्रथम मंचर येथील कंपनीच्या शेतावर ड्रोनची चाचणी घेण्यात येणार आहे.

सिंजेंटा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुशिल कुमार, मुख्य माहिती व डिजिटल ऑफिसर फिरोज शेख, भारतीय तंत्रज्ञान संस्था रोपरचे सहयोगी अधिष्ठाता पुष्पेंद्र सिंग, प्रा. सुमन कुमार यांच्या उपस्थितीत यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी कंपनीच्या वतीने जैवविविधतेच्या संरक्षणासाठी बायोडायव्हर्सिटी मॉनिटरिंग तंत्रज्ञानाची घोषणाही करण्यात आली.

सुशिल कुमार म्हणाले, ‘ड्रोनचा आणि इतर तंत्रज्ञान आधारित अभिनव संकल्पनांचा वापर हा भारतीय शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन सुधारण्यासाठी आणि नफा वाढविण्यासाठी उपयोगी पडणार हे. देशातील शेतकऱ्‍यांना दर्जेदार पीक संरक्षण,मउत्पादने,बियाणे आणि सोल्युशन्स प्रदान करण्याकडे सिंजेंटाचा कल आहे.’ केंद्र सरकारच्या सेंट्रल इनसेक्टीसाईड बोर्डकडून ड्रोनचा वापर करून बुरशीजन्य संसर्ग,ब्लास्ट आणि शीथ ब्लाईट यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सिजेंटाला मान्यता मिळाली आहे.

शेख म्हणाले, ‘बायोडायव्हर्सिटी प्रकल्पाच्या प्रारंभिक टप्प्यात शेतातील कीटकांचे जीवन ओळखण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे निरोगी कृषी जैव परिसंस्थेसाठी योगदान देणाऱ्‍या कीटकांच्या लोकसंख्येचा चांगल्या प्रकारे मागोवा घेता येईल व मोजमाप करता येईल. ज्याद्वारे त्यांचे संरक्षणाच्या दृष्टीने पुरक कार्य करता येईल.’ देशभरातील सुमारे एक हजार शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा ड्रोनयात्रेचा प्रयत्न आहे.

Web Title: One Thousand Kilometers Of Drone Journey For The Awareness Of Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top