Robotic Knee Surgery : नोबल रूग्णालयाने केल्या एक हजार यशस्वी रोबोटिक गुडघा बदल शस्त्रक्रिया

वैद्यकीय क्षेत्रातील नवनवे संशोधन रूग्णांसाठी वरदान
One thousand successful robotic knee replacement surgeries Noble Hospital health
One thousand successful robotic knee replacement surgeries Noble Hospital health sakal

हडपसर : वैद्यकीय क्षेत्रातील नवनवे संशोधन रूग्णांसाठी कायमच वरदान ठरत आले आहे. वृध्दत्वाकडे झुकणाऱ्या वयात अनेकांना गुडघा दुखीला सामोरे जावे लागते. त्याच्या उपचारात रूग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत.

मात्र, गेल्या काही वर्षात रोबोटिक गुडघा बदल शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाने त्यावर चांगलीच मात केली आहे. येथील नोबल रूग्णालयाने या तंत्रज्ञानाचा वापर करीत गेली चार वर्षात एक हजार यशस्वी रोबोटिक गुडघा बदल शस्त्रक्रिया केल्या आहेत, अशी माहिती रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने यांनी दिली.

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरने रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत एक हजाराच्या वर गुडघा बदल शस्त्रक्रिया यशस्वी करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्या निमित्ताने रूग्णालयात विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. माने यांनी ही माहिती दिली. गुडघा शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या नवीन रूग्णांना यावेळी त्यांनी खर्चातील काही सवलतीही जाहीर केल्या.

कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे म्हणाले, “रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट प्रक्रियेमुळे रुग्णांना सांधे आणि गुडघ्याच्या आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. ज्या रूग्णांनी रोबोटिक आर्म-सिस्टेड शस्त्रक्रिया केली त्यांच्या वेदना कमी होऊन कार्य लवकर सुधारले आहे.

वेदनाशामक औषधांची गरज कमी होऊन हाताने होणाऱ्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत जलद पुनर्प्राप्ती होण्याचा अनुभव अनेक अभ्यासांनी सिद्ध केला आहे. त्यामुळे हे रोबोटिक तंत्रज्ञान लाभदायी ठरत आहे.' रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अनिकेत पाटील म्हणाले, "हे क्रांतिकारी तंत्रज्ञान अत्यंत अचूक रोपण असलेल्या रूग्णांना अधिक सानुकूलित प्रक्रिया देण्यास आम्हाला सक्षम करते.

रोबोटिक गुडघा बदलाने रुग्णांना अधिक लवचिकता व हालचाल, चांगले संतुलन, आसपासच्या ऊतींना कमी नुकसान, कमीतकमी रक्त कमी होणे, जलद पुनर्प्राप्ती प्रदान होते. दीर्घकाळ टिकणारा हा कृत्रिम सांधा रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारतो.

ही रोबोटिक सहाय्य शस्त्रक्रिया आम्हाला रुग्णाची सामान्य संरेखन अचूकतेसह पुनर्संचयित करण्यास अनुमती देते, शस्त्रक्रियेची पुनरावृत्ती शक्यता कमी करते आणि रुग्णांना नैसर्गिक संवेदना देते. आतापर्यंत आम्ही एक हजार शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com