
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या वस्तूंवर बाजार फी आकारली जात नाही, अशा सर्व एक टक्का ‘यूझर चार्जेस’ लावण्याचा फेरप्रस्ताव पणनला पाठवला आहे. परंतु या प्रस्तावाला मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यामुळे पारंपरिक व्यापार संपुष्टात येऊन त्यावर अवलंबून असलेल्या मोठ्या वर्गावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.