esakal | पुणे : भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृ्त्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus_India

- भिगवण स्टेशन (ता.इंदापूर) येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला

पुणे : भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृ्त्यू

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : भिगवण स्टेशन (ता.इंदापूर) येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कुंभार यांनी दिली आहे. यापूर्वीही भिगवण स्टेशन येथील एका 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा भिगवण स्टेशन येथीलच 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणे येथे उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अडीच महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा भिगवण स्टेशन येथील ४० वर्षीय महिलेस कोरोनाची लागण होऊन सदर महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला दमा व इतर आजारांनी ग्रस्त होती. चार दिवसांपूर्वी आजारी पडल्यामुळे सदर महिलेस बारामती येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महिलेची स्थिती बिघडल्यामुळे शुक्रवारी (ता.१०) सदर महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शनिवारी (ता.११) सकाळी महिलेचा मृत्यू झाला व त्यानंतर तिचा कोरोना चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे भिगवण स्टेशन येथील दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे या भागामध्ये खळबळ उडाली. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे व त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, भिगवण स्टेशन येथील 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रशासनाचे पुढील आदेश आल्यानंतर भिगवण स्टेशन परिसर सील करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य 
ती काळजी घ्यावी.