Pune : महिलेशी असभ्य वर्तन करणा-यास एक वर्षे कैदेची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court
महिलेशी असभ्य वर्तन करणा-यास एक वर्षे कैदेची शिक्षा

महिलेशी असभ्य वर्तन करणा-यास एक वर्षे कैदेची शिक्षा

sakal_logo
By
विजय जाधव

भोर (पुणे) - महिलेशी असभ्य आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केलेल्या आरोपीस भोरच्या न्यायालयाने एक वर्षांच्या साध्या कैदेची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदाशिव तुकाराम भालेघरे (रा. केंजळ) असे शिक्षा केलेल्या आरोपीचे नाव असून भोरचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. के. मुळे यांनी मंगळवारी (ता.२३) ही शिक्षा सुनावली. याबाबतची हकीकत अशी, ३० एप्रिल २०१७ रोजी आरोपी याने शेजारच्या गावातील महिलेच्या घरात जाऊन अश्लिल बोलून तीचा हात धरून विनयभंग केला.

हेही वाचा: शिक्रापूर दरोडा व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद

संबंधीत महिलेने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तपासी अंमलदार डी. बी. सवाणे यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयाने पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवली आणि कागदपत्रांची पाहाणी केली. त्यानंतर न्यायाधीश एस. के. मुळे यांनी आरोपी सदाशिव यास एक वर्षांच्या साध्या कैदेची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील एस. एम. धुमाळ व एस. एम. अरणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना राजगड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार विठ्ठल महांगरे व दीपक धुमाळ यांनी सहकार्य केले. तसेच प्रभारी पोलिस अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी काम पाहिले.

loading image
go to top