कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ट्विटला सुप्रिया सुळे यांच्याकडून ..  

संदीप नवले
बुधवार, 20 मे 2020

कांदा विकायचा कसा? असा प्रश्‍न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा तरुण शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्‌विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली.

une-news">पुणे व नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे कांदा विकायचा कसा? असा प्रश्‍न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा तरुण शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्‌विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली. त्याची तातडीने दखल घेऊन त्यांनी कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले.

 

 

लय भारी...शिवरीकरांच्या खड्या पहाऱ्याने कोरोना पळाला कोसो दूर...  

पुण्यातील पुणे, चाकण, मंचर, जुन्नर, आळेफाटा, ओतूर, शिरूर येथील कांदा बाजार चालू- बंद होत आहे. नगरमधील घोडेगाव व राहुरी येथील कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याची तक्रार शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्‌विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. त्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली असून, कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले आहे.

 

 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दाभाडे पाटील यांच्या ट्‌विटला उत्तर देताना सुळे यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील कांदा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सध्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, नगर, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर हे बाजार सुरू आहेत. उर्वरित राहुरी आणि घोडेगाव येथील बाजार देखील लवकरच सुरू होईल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगर जिल्ह्यापाठोपाठ पुण्यातील पुरंदर तालुक्‍यातही कांदा बाजार सुरू करावेत. तसेच, मराठवाड्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात तातडीने बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी अभिजित जगताप, श्‍याम प्रकाश जिगे यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion grower appeals to Supriya Sule by tweeting