बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवड्यात प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांची वाढ, भाव पोहोचला साडेपाच हजार रुपयांवर

बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवड्यात प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांची वाढ, भाव पोहोचला साडेपाच हजार रुपयांवर
Published on

आठवडाभरात कांद्याच्या दरात
प्रतिक्विंटल दोन हजारांची वाढ

सोलापूर बाजार समितीत भाव पोचला साडेपाच हजार रुपयांवर

उ. सोलापूर, ता. १९ : बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली असून बुधवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कमाल दर प्रति क्विंटल साडेपाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले. बाजार समितीच्या नोंदीनुसार एकूण २८ हजार २२८ पिशव्यांची आवक झाली. सरासरी दर मात्र तीन हजार रुपयांच्या जवळ आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेने हे दर जवळपास प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांनी सुधारले आहेत.
बाजार समितीत बुधवारी कमाल पाच हजार ५०० रुपये, तर सर्वसाधारण २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. बाजारात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी व कमी आवकमुळे कांदाला चांगले दर मिळत आहे. दरम्‍यान, बाजारात चाळीत साठवलेल्या उच्च दर्जाच्या कांद्याला पाच हजारांपेक्षा जास्‍त दर मिळत आहे. तर सरासरी दर तीन हजारांच्‍या आसपास आहे. मात्र, कमी प्रतीच्या कांद्याला मात्र प्रतिक्विंटल अवघा पाचशे रुपये इतका दर मिळत आहे.

----चौकट---
चार कोटींची झाली उलाढाल
बाजार समितीत एकूण १४६ ट्रक कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याच्‍या लिलावातून ४ कोटी २३ लाख ७४ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्‍याची माहिती बाजार समितीने दिली आहे.

आवक वाढल्‍यास भाव घसरणार
मागील काही दिवसापासून कांद्याच्‍या दरात वाढ होत आहे. ही दरवाढ अशीच राहिल्‍यास येत्‍या काळात बाजार समितीत कांद्याची आवक होण्याची शक्‍यता आहे. त्‍यावेळी मात्र, कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात ढासळण्याची शक्‍यता आहे.
--------

गत आठवड्यातील कांद्याची आवक व सध्याची आवक व दर

बुधवार दिनांक १२ ऑगस्ट
एकूण कांद्याची आवक -११ हजार ५८ क्विंटल
कमाल दर -३६०० रुपये प्रति क्विंटल
सरासरी दर-१९०० रुपये प्रति क्विंटल

बुधवार दिनांक १९ ऑगस्ट
एकूण कांद्याची आवक -१४ हजार ६६२ क्विंटल
कमाल दर-५५०० रुपये प्रति क्विंटल
सरासरी दर-२९०० रुपये प्रति क्विंटल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com