सर्वसामान्यांना कांदा रडवणार; किरकोळ बाजारात किलोला 40 ते 45 रुपये दर

onion1.jpg
onion1.jpg
Updated on

मार्केट यार्ड (पुणे) : दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू होते. मात्र, राज्यात पाऊस सुरू असल्याने मोठे नुकसान झाल्याने कांद्याची आवक घटली आहे. तसेच आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकह काही राज्यांतून कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. सध्या घाऊक बाजारात 10 किलो कांद्याला 270 ते 340 रुपये तर किरकोळ बाजारात एका किलोला 40 ते 45 रुपये दर मिळत आहेत. 

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात कांद्याची आवक घटत चालली आहे. तसेच, पावसामुळे कांदा पीक काढणे शेतकऱ्यांना अवघड जाऊ लागले आहे. त्यातच कांद्याचा दर्जाही खराब होत आहे. त्याशिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेशातील कांदा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे पुणे विभागातील जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी दर वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या 10 किलोला 250 ते 280 रुपये दर होते. पुण्यात श्रीगोंदा, नगर येथून कांद्याची आवक होत असल्याचे व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान फलटण, माण, खटाव भागात पाऊस सुरू असल्याने तेथून 100 ते 200 कांदा पिशव्यांचीच आवक होत आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडूतून येथील कांद्याला मागणी वाढली असल्याचे विलास रायकर यांनी दिली. 


पावसामुळे नव्या कांद्याचे पीक वाया गेल्याने आवक घटली आहे. त्यामुळे मार्केट यार्डात रविवारी फक्त 50 ट्रक कांद्याचीच आवक झाली. तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेशातून कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. 
- विलास भुजबळ, 
अध्यक्ष, अडते असोसिएशन 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com