किरकोळ बाजारात कांदा 100 रुपयांवर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी निर्यातबंदी केली; परंतु लांबलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले.बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी असून, तुटवडा जाणवत आहे.

मार्केट यार्ड - नवीन हंगाम लांबणीवर पडल्यामुळे कांद्याचे दर वधारत आहेत. सोमवारी घाऊक बाजारात 10 किलो जुन्या कांद्याचे दर 550 ते 620 रुपये होते. मंगळवारी यामध्ये सुधारणा होऊन दर 750 ते 850 रुपयांवर गेले, तर किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील बाजार आवारात खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि संगमनेर परिसरातून नवीन कांद्याची अत्यल्प आवक होत आहे. मार्केट यार्डातील कांदा विभागात मंगळवारी 70 ट्रक कांद्याची आवक झाली. सध्या शहरातील हॉटेल, खानावळी, विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे कांद्याला मागणी वाढत आहे. दक्षिण भारतातून केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातूनही जुन्या कांद्याला मागणी वाढत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी निर्यातबंदी केली; परंतु लांबलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला. बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी असून, तुटवडा जाणवत आहे. परिणामी, कांद्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याची माहिती व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion at Rs 100 in the retail market