

Onion storage unit owned by farmer Prabhakar Bhapkar in Aurangpur, Junnar.
esakal
नारायणगाव : औरंगपूर (ता. जुन्नर) येथील कांदा चाळीतील कांदा भरलेल्या प्रतिगोण 50 किलोग्रॅम वजनाच्या 51 कांदा गोणी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी कांदा उत्पादक शेतकरी प्रभाकर संभाजी भापकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.