Video: पुण्याच्या बाजारात काय स्वस्त? काय महाग? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

हिरवी मिरची, मटार, नारळाच्या भावात वाढ झाली आहे. तर टोमॅटो, कारली, बीट, घेवडा, कांद्याच्या भावात घट झाली आहे. तसेच इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मार्केट यार्ड(पुणे) : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आभाळ असल्याने फळभाज्यांची अवाक वाढली आहे. हिरवी मिरची, मटार, नारळाच्या भावात वाढ झाली आहे. तर टोमॅटो, कारली, बीट, घेवडा, कांद्याच्या भावात घट झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी येथील बाजारात १६० गाड्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढली आहे. परराज्यातून आलेल्या मालामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यांतुन सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथुन ६ ट्रक कोबी, तामिळनाडू, आंध्रप्रदेशातून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थान येथून गाजर ८ ट्रक, मध्य प्रदेशातून मटार १२ ट्रक, मध्यप्रदेश, गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, गुजरात, तळेगांव आणि इंदौर येथुन मिळून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यसाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Tomato beans soya beans Bitter gourd gimcrack and Green Chilli Coconut Expensive in Pune Market yard