Pune : म्हाडाच्या सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mhada

म्हाडाच्या सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आजपासून

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत म्हाडाच्या विविध योजनतील २ हजार ८२३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत १ हजार ३९९ सदनिका अशा एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १६) होणार आहे.

मुंबई येथील मंत्रालयातील उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात आज दुपारी २.४५ वाजता हा कार्यक्रम होईल. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोडतीचा प्रारंभ होणार आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत विविध योजनेतील ४ हजार २२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता.

loading image
go to top