शिक्षकानों वर्क फ्रॉम होम करताय! ऑनलाईन पध्दतीने होणार मुल्यमापन

Online assessment of teachers who doing work from home
Online assessment of teachers who doing work from home

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनांमधील शिक्षकांनो, वर्क फ्रॉम होम करीत असाल, तर तंत्र शिक्षण संचालनालय त्याचे मूल्यमापन ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. केलेल्या कामाचा तपशील  द्यावा लागणार आहे. शिक्षकांच्या या कामाची दखल गोपनीय अहवालात घेतली जाणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम' पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमास प्रवेश घेणे आणि तो पूर्ण करणे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमांची माहिती पुरविणे, त्यांना विषयनिहाय  व्हिडिओ इमेल वा व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध करून देणे, ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा (स्वयम, नीट, कोर्सेरा आदी) अध्ययनासाठी स्वतः शिक्षकांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी वापर करावा, असे सांगितले होते.

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

ऑनलाईन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून शिक्षकांनी स्वतः विषयनिहाय व्हिडीओ क्लीप तयार करून  विद्यार्थ्यांना पुरविणे, व्हॉट्सअँप समूहाद्वारे असाइंन्मेंट देणे, पुढील सत्राचे शैक्षणिक नियोजन विभागास सादर करणे, प्रश्नांची बँक तयार करणे, व्हॉट्सअँप समूहाद्वारे शंका निरसन इत्यादी अनेक पर्याय सुचविण्यात आले. त्याचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे सूचित करण्यात आले होते.

आता यापुढील टप्प्यात  सर्व संस्थांचा आढावा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने ठरविले आहे. सर्व संस्था आणि शिक्षक यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करताना कोणकोणते पर्याय वापरले, त्यांची परिणामकारकता काय , किती विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक आणि संबंधित संस्थेचे  प्राचार्य यांना जबाबदारी दिली आहे. हे कामही अॅपद्वारे करण्यात येणार आहे.

तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले, "शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी अॅप तयार केला आहे. त्यात शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम काळात केलेल्या कामाची माहिती अपलोड करायची आहे. ती सबमिट केल्यानंतर प्राचार्य त्यावर ऑनलाइन शेरा मारतील. पुढे ही माहिती संचालनायाकडे येईल. त्याआधारे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात नोंदी केल्या जातील."

अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमधील शिक्षकीय पदांना सातवा वेतन आयोग लागू करताना शासनाने शिक्षकाची कामगिरी तपासण्यासाठी 360 डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. या अनुषंगाने शिक्षक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि मूल्यमापन करताना त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' अंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यमापन समाविष्ट असेल. लॉकडाउन कालावधीत विद्यार्थ्यांचे कमीत कमी शैक्षणिक नुकसान होईल, यासाठी ही उपाययोजना केली आहे,असे डॉ. वाघ यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com