esakal | कोविड शववाहिकेसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा

बोलून बातमी शोधा

Ambulance
कोविड शववाहिकेसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यात रोज कोरोनाने सरासरी दीडशे जणांचा मृत्यू होत आहे. पण रुग्णवाहिका मिळण्यापासून ते अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मिळेपर्यंत नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने खास ‘कोविड शववाहिनी’ हे ॲप तयार केले आहे. त्यावर रुग्णवाहिका मिळणार आहेच, पण त्याचबरोबर कोणत्या स्मशानभूमीत लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहिती नातेवाईक, रुग्णालय व शववाहिकेच्या चालकाला मिळणार आहे. मृतांची संख्या वाढत असताना हेल्पलाइन उपयोगी ठरत नसल्याने नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे. मनस्ताप कमी करण्यासाठी ॲप तयार केले आहे.

शहरात रोज किमान १५० जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्याचा ताण निर्माण होत असल्याने हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे नातेवाइकांना शववाहिका व स्मशानभूमी यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. स्मशानभूमीतील वेटिंग कमी होईल.

- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंतिम संस्कार होईपर्यंत त्याच्या नातेवाइकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी हे नवीन ॲप नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल.

- गणेश बिडकर, सभागृह नेता

हेही वाचा: लॉकडाउनमध्येही आयटी कंपन्यांचे 'उद्योग'सुरूच

हे लक्षात ठेवा

  • शववाहिकेसाठी सुरू केलेल्या क्रमांकावर फोन करून रुग्णालयातील कर्मचाऱ्याने किंवा नातेवाइकाने डेथ पास क्रमांक सांगावा

  • पालिकेने नेमलेली व्यक्ती हा क्रमांक ॲपमध्ये टाकेल. त्या वेळी मृताची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल

  • रुग्णालयाच्या जवळच्या भागात असलेल्या शववाहिकेचा क्रमांक, चालकाचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक मिळेल

  • ही शववाहिका बुक झाल्यानंतर लगेच अंत्यसंस्कार करायचे आहेत

  • ही माहिती ‘एसएमएस’द्वारे नातेवाईक, चालक, रुग्णालय प्रशासनाला जाईल