esakal | तहसीलदारांना 50 हजार रुपयांची ऑनलाईन लाच देण्याचा प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

तहसीलदारांना 50 हजार रुपयांची ऑनलाईन लाच देण्याचा प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर : बनावट कागदपत्रे सादर करून हडपसर येथील कोट्यावधी रुपये किंमतीची वनखात्याची जमीन बळकाविल्याप्रकरणी हवेलीच्या तहसीलदारांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. या घटनेस 10 दिवस होत नाहीत, तोच एका अनोळखी व्यक्तीने हवेली तहसीलदारांच्या गुगल पे खात्यामध्ये 50 हजार रुपयाची लाच पाठविल्याची तक्रार तहसीलदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केल्याचा दावा त्यांनी केला.

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी तक्रार दिली आहे. कोलते पाटील यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी बस डेपो जवळ बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर (एमएच 16 टी 4100) कारावाई केली होती. चालकास ट्रक बाजुला घेण्यास सांगून कोलते पाटील त्यांच्या सरकारी गाडीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या एका तरुणाने तो ट्रकचा मालक असल्याचे सांगून ट्रक सोडण्याची विनंती केली. तसेच पैशाचे आमिषही दाखवू लागला. त्यावेळी कोलते पाटील यांनी त्यास नकार देत तलाठ्यास पुढील कारवाई करण्याच्या सुचना देऊन त्या तहसील कार्यालयात गेल्या.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजता त्यांची बैठक संपल्यानंतर अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन त्यांना आलेल्या फोनला त्यांनी प्रतिसाद दिला. तेव्हा संबंधीत व्यक्तीने त्यांच्या बॅंक खात्याची माहिती मागून त्यांच्या खात्यात चालकाने पैसे पाठविण्यास सांगितल्याचे त्यांना सांगितले. त्यावर कोलते पाटील यांनी त्यास खडसावले. त्यानंतर त्यांच्या गुगल पे खात्यावर 50 हजार रुपये जमा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ "एसीबी'कडे तक्रार दिली. दरम्यान, याप्रकरणी "एसीबी'शी संपर्क साधल्यानंतर त्यांनी यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

loading image
go to top