बारामतीकरांनो, पुढची चिंता सतावतेय; मग थांबा एक फोन करा अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

- लॉकडाऊनमध्ये घरात बसून अनेकांना नैराश्येने ग्रासले आहे. पुढे काय होणार या चिंतेने अनेकजण हतबल झाले आहेत. इतर सर्व बाबींसह सध्या गरज आहे ती ऑनलाईन समुपदेशनाची. 

बारामती : लॉकडाऊनमध्ये घरात बसून अनेकांना नैराश्येने ग्रासले आहे. पुढे काय होणार या चिंतेने अनेकजण हतबल झाले आहेत. इतर सर्व बाबींसह सध्या गरज आहे ती ऑनलाईन समुपदेशनाची. येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा मानसशास्त्र विभाग यांच्यामार्फत ऑनलाईन आणि टेलिफोनद्वारे समुपदेशन (काउन्सेलिंग) आणि मानसिक आरोग्य सेवा देण्याचा एक वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. चिंता, अनिश्चितता, निराशा, भीती,  सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा सामना करणे कठीण जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि उच्च धोक्यामध्ये वावरणाऱ्या लोकसंख्येवर कोरोनाचा प्रभाव नोंदवून त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी मानसशास्त्र विभागाने ही सेवा सुरु केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर म्हणाले, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार शिंदे व त्यांचे सहकारी यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची सेवा देण्याचे ठरवले आहे. विभागातील सर्व प्राध्यापक या समुपदेशन कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार असून, डब्ल्यूएचओ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे हा समुपदेशन सेवेचा उपक्रम हाती घेतला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विद्यार्थ्यांसह नागरिकांना खालीलपैकी कोणत्याही विषयावर तणाव जाणवत असेल तर त्यांनी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन केल्यास त्यांना समुपदेशन सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. यात खालील बाबींचा समावेश आहे. 

- आपणास तणाव,  भीती  किंवा चिंता वाटते का? 

-  परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जाते आहे का? 

- आत्महत्येचे विचार मनात येत आहेत का? 

- सामाजिक विलगीकरणामुळे अस्वस्थ वाटते का?

- वेळेचे नियोजन करणे कठीण जाते आहे का? 

- तुम्ही खूप विचार करत आहात का?

- झोप लागणे कठीण होते आहे का? 

-  रोजची कामे करणे कठीण जाते आहे का? 

- लहान मुलांना सांभाळताना चिडचिड होती आहे का? 

- ज्येष्ठ नागरिकांना अशा परिस्थितीचा सामना करणे कठीण वाटते का? 

आणखी वाचा - कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग, पुण्यात!

यापैकी कोणत्याही प्रश्नाचा उत्तर जर होय असे असेल तर तुम्ही नक्कीच समुपदेशकांची  मदत घेतली पाहिजे. डॉ.विजयकुमार शिंदे 7588945168 (वेळ- सकाळी10 ते12), ज्योतीराम आवटे- 981318007 (वेळ - दुपारी 12 ते 2),
दत्ता लोंढे – 7709695134 (वेळ -दुपारी  2 ते 4), दत्तात्रय खोमणे -9850791210 (वेळ -सायंकाळी 4ते 6), डॉ. गणेश ढमे- 9604068959
(वेळ - सांयकाळी  6 ते 8)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Counselling provide to Peoples of Baramati