
पुणे : म्हाडाच्या सदनिका सोडतीसाठी उद्यापासून ऑनलाइन नोंदणी
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सदनिकांची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना येत्या गुरुवारपासून (ता.९) आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे. या सोडतीसाठी पुणे शहर व परिसरात म्हाडाच्या पाच हजार ६८ सदनिका उपलब्ध असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी सांगितले.
या उपलब्ध असलेल्या एकूण सदनिकांपैकी म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील शिल्लक राहिलेल्या २७८, बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्के कोट्यातून उपलब्ध झालेल्या २ हजार ८४५ आणि म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील १ हजार ९४५ अशा सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अगोदर आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या आॅनलाइन नोंदणीचा शुभारंभ येत्या गुरुवारी (ता.९) दुपारी दोन वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
Web Title: Online Registration For Mhada Flat Release 5000 Flats Available In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..