ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा ‘यंग बझ’तर्फे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

लहानपणापासूनच मुलांना चित्रपटातील गाणी व नृत्याचे आकर्षण असते. टीव्हीवर लागणाऱ्या गाण्यांवर त्यांचे पाय थिरकतात. तुमच्या मुलांमधील या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ ‘यंग बझ’ व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. गेली ११ वर्षे ‘किड्‌स आयडॉल’ हा उपक्रम ‘यंग बझ’तर्फे राबविला जात आहे.

पुणे - लहानपणापासूनच मुलांना चित्रपटातील गाणी व नृत्याचे आकर्षण असते. टीव्हीवर लागणाऱ्या गाण्यांवर त्यांचे पाय थिरकतात. तुमच्या मुलांमधील या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ ‘यंग बझ’ व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. गेली ११ वर्षे ‘किड्‌स आयडॉल’ हा उपक्रम ‘यंग बझ’तर्फे राबविला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयोगटानुसार ऑनलाइन सोलो नृत्य स्पर्धा ‘अ’ ते ‘ड’ या गटांत विभागण्यात आली आहे. ‘अ’ गटात नर्सरी ते सिनिअर केजी, ‘ब’ गटात पहिली ते तिसरी, ‘क’ गटात चौथी ते सहावी आणि ‘ड’ गटात सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. स्पर्धेत ‘आयटम सॉग्स’ ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

नोंदणीची मुदत गुरुवारपर्यंत
खालील क्‍यूआर कोड स्कॅन करून स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे आणि खालील व्हाॅट्‌सॲप नंबरवर प्रवेश शुल्क भरल्याची पावती स्पर्धकाचे नाव, वय, इयत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल आयडीसहित पाठवावी. रजिस्ट्रेशन गुरुवार (ता. १०) पर्यंत करावे. एन्ट्री फी २५० रुपये.
संपर्क क्रमांक - ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३ व ९३५६८९५१८६

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Solo Dance Competition by Young Buzz