पिंपरीसह पुणे जिल्ह्यातील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाइन निविदा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

औद्योगिक वसाहत - मोकळ्या भूखंडांची संख्या 
पिंपरी-चिंचवड :    १२ 
चाकण फेज १, २ :     ६ 
तळेगाव दाभाडे :    २
रांजणगाव :    ३२
बारामती :    २
जेजुरी :    २
कुरकुंभ :    २

पिंपरी - स्टार्ट अप कंपनी सुरू करण्याचा कोणी विचार करीत असेल, तर त्यांच्या समोर पहिला प्रश्‍न उभा राहतो तो जागेचा. मात्र, त्याचा हा ताण आता हलका होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या मोकळ्या भूखंडासाठी ऑनलाइन निविदा मागविल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या कंपन्यांना संधी
स्टार्टअप अंतर्गत नव्याने कंपनी सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्या उद्योजकांना औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एमआयडीसीमध्ये जागा न मिळालेल्या नव्या कंपन्यांनी खासगी जागा घेऊन त्याठिकाणी उद्योग सुरू केले आहेत. मात्र, आता औद्योगिक वसाहतींमध्येच भूखंड उपलब्ध होत असल्याने उद्योगासाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा त्यांना तिथे उपलब्ध होणार आहेत.

‘सकाळ वसंतोत्सवा’ची सुरुवात आजपासून

ऑटोमोबाइल, इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विदेशातील अनेक कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छूक आहेत. त्यांनाही या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे. पुण्यामध्ये कुशल मनुष्यबळ, शैक्षणिक सुविधा उत्तम आहेत. त्यामुळे देश-विदेशातील अनेक उद्योग इथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

औद्योगिक वसाहतींमध्ये एमआयडीसीकडे असणाऱ्या मोकळ्या भूखंडाचा लिलाव करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अर्ज www.midcindia.org या संकेतस्थळावर तीस जानेवारीपर्यंत ऑनलाइन दाखल करायचा आहे. 
- संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Tender for Industrial Plots in Pune District with Pimpri