विद्यार्थी, पालकांनी बनविल्या गणेश मूर्ती; ऑनलाइन कार्यशाळेत मिळालं मार्गदर्शन

नितीन बिबवे
Tuesday, 4 August 2020

रोजच पाच तास ऑनलाइन शाळा, कसलाही विरंगुळा, वेगळेपण काहीच नाही. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून गणपती मूर्ती बनवण्याची ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन कला शिक्षिका विजया वेल्हाळ यांनी केले होते.

बिबवेवाडी (पुणे) : रोजच पाच तास ऑनलाइन शाळा, कसलाही विरंगुळा, वेगळेपण काहीच नाही. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून गणपती मूर्ती बनवण्याची ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन कला शिक्षिका विजया वेल्हाळ यांनी केले होते. कार्यशाळेमध्ये  विद्यार्थी व पालकांनी सहभागी होत एक मूर्ती बनवण्यासाठी संपूर्ण कुटुब कार्यरत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गणेश मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती मिळाली नसली, तरी काहींनी मैद्यापासून क्ले तयार करून मूर्ती बनवण्याचा आंनद घेतला. गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा हा उपक्रम अतिशय वेगळा होता. ज्याठिकाणी समोरासमोर गणेश मूर्ती बनवणे अवघड जाते, तेथे ऑनलाइन कार्यशाळा घेणे जिकरीचे व चॅलेंज होते, असे विजया वेल्हाळ यांनी सांगितले. त्यासाठी संगीत, गणपतीची गाणी गात विद्यार्थी कंटाळाणार नाही, याची खबरदारी घेत विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान दिले. विद्यार्थ्यांकडून मूर्ती बनवून घेण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांनी कला शिकावी, आत्मनिर्भर व्हावे. नदी व पाण्याचे प्रदूषण न होता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे. गणेश मूर्तीचे पावित्र्य राहावे. नागरिकांना एक कला अवगत व्हावी, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात बाजारात रासायनिक रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. त्यामुळे प्रदूषण वाढते म्हणून शाडू मातीच्या मूर्ती असाव्यात. मागील ३५ वर्षे त्या मुलांना मोफत मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेत आहेत. पहिल्यांदाच ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात वेगळेपण समजून आले, असे वेल्हाळ यांनी मत व्यक्त केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अनिल दाहोत्रे यांनी केले, तर आभार डॉ. योगेश पवार यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online workshop for making Ganesha idols