
पुणे : शहरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या केवळ २४ असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात असताना महापालिका आयुक्तांनी याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पण क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांकडून माहिती मागविल्यानंतर स्वतःच्या स्वाक्षरीशिवाय माहिती सादर करून लपवाछपवी केली जात आहे. त्यामुळे आता याविरोधात आयुक्त नवलकिशोर राम काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.