Pune News : खोदाई केलेले ४० टक्केच रस्ते पूर्ववत; दुरुस्तीत दिरंगाई, पुण्यात कामचुकार ठेकेदारांवर कारवाईचा इशारा

पुणे शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी खोदलेल्या रस्त्यांपैकी केवळ ४० टक्के रस्ते दुरुस्त झाल्याने यंदा पुणेकरांना पावसाळ्यात खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.
pune road digging

pune road digging

sakal

Updated on

पुणे - शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी खोदलेल्या रस्त्यांपैकी केवळ ४० टक्के रस्ते दुरुस्त झाल्याने यंदा पुणेकरांना पावसाळ्यात खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. रस्ते तातडीने पूर्ववत न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा स्थायी समितीने दिला आहे.

शहरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही प्रकल्पाअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात दोन हजार २५० सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत मागील काही महिन्यांपासून २८ किलोमीटरचे रस्ते, पदपथांवर खोदाईची कामे केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com