
प्रज्वल रामटेके
पुणे : परदेशात उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभाग ‘राजश्री शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना’ राबवितो. यासाठी केवळ ७५ जणांची निवड होत असल्याने शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांची संधी पात्र असूनही हुकते. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या जागा तीनशेपर्यंत वाढविण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.