
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता केवळ खडकवासला विधानसभा निवडणुकीतील २ यंत्रांमधील मतांची पडताळणी होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतांची पडताळणी रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते उमेदवार प्रशांत जगताप यांनी उच्च न्यायालयात पुन्हा मतदान याचिका दाखल केल्याने निकालानंतरच ही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.