लिंबाची विक्री फळ बाजारातच करा; गरड यांचे आदेश

प्रवीण डोके
Friday, 18 September 2020

गुलटेकडी येथील बाजार समिती स्थापन झाल्यापासून लिंबाची घाऊक विक्री ही फळ बाजारात होत होती. मात्र तरकारी विभागातील काही व्यापारी लिंबाची विक्री तरकारी विभागात करत होते. मात्र आता लिंबाची विक्री फळ बाजारातच करा असे स्पष्ट आदेश पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मार्केट यार्ड - गुलटेकडी येथील बाजार समिती स्थापन झाल्यापासून लिंबाची घाऊक विक्री ही फळ बाजारात होत होती. मात्र तरकारी विभागातील काही व्यापारी लिंबाची विक्री तरकारी विभागात करत होते. मात्र आता लिंबाची विक्री फळ बाजारातच करा असे स्पष्ट आदेश पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फळं बाजारातील लिंबाच्या घाऊक व्यापाऱ्यांनी तरकारी विभागात होणाऱ्या लिंबाच्या विक्रीबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी प्रशासक मधुकांत गरड, उपसचिव सतीश कोंडे, लिंबाचे व्यापारी रोहन जाधव, सुधीर जाधव, बबलू बागवान, राहुल हेंद्रे, संतोष पोळ यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या मुख्य ऑफिसमध्ये बैठक पार पडली. यावेळी गरड यांनी लिंबू व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बर्थ डे स्पेशल...डॉक्टर- ॲक्टर ते खासदार : अमोल कोल्हे यांचा झंझावती प्रवास

बाजारात सुरुवातीपासूनच फळ विभागात फळे विक्री, तरकारी विभागात फळभाज्या, पालेभाज्य विक्री, तर कांदा बटाटा विभागात कांदे आणि बटाटे विक्री होते. परंतु मागील साधारणतः एक वर्षापासून काही व्यापारी तरकारी विभागात लिंबू विक्री करत होते. याबाबत लिंबाच्या व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यावर तोडगा निघत नव्हता. परंतु याबाबत गरड यांनी तरकारी विभागातील लिंबू विक्री तत्काळ थांबवण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासूनचा लिंबू विक्रीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only sell lemons in the fruit market madhukant garad