पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण एक लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील ९० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सेट परीक्षेत एकूण ६.६९टक्के म्हणजेच केवळ सहा हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.