...तरच नोव्हेंबरनंतर कोरोना मुक्ती

Map
Map

जनसंख्याशास्त्रातील शास्त्रज्ञांचे संशोधन; प्रसाराचा दर कमी होण्याचा अंदाज 
पुणे - लॉकडाउन शिथिल झाले म्हणून बेफिकिरीने वागाल, तर कोरोना आटोक्‍यात येणार नाही, असा निष्कर्ष मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (आयआयपीएस) शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या आधारे मांडला आहे. मात्र, नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास कोरोना प्रसाराचा दर सध्यापेक्षा कमी होत तो नोव्हेंबर अखेर शून्यापर्यंत पोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लॉकडाउन-३ नंतर कोरोनाच्या प्रसाराचा संख्याशास्त्रीय पद्धतीने आढावा घेण्यात आला. कोरोनाचा संशयित, बाधित आणि बरे होणाऱ्या (एसआयआर) संख्येच्या आधारावर विकसित कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या आधारे त्यांनी ही मांडणी केली आहे. कौशलेंद्र कुमार, अभिशेक सिंग, डब्ल्यू. बिग्यानंद मैती या संशोधकांनी लॉकडाउन १ आणि २च्याआधारे संपूर्ण देशासह स्वतंत्रपणे महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात या राज्यांसाठी अहवाल सादर केला आहे. कोरोना प्रसारासह बरे होणाऱ्या रुग्णांचा वाढता दर समाधानकारक असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

प्रसाराचा दर (आर नॉट) म्हणजे काय? 
कोरोनाबाधित व्यक्तीने त्याच्या आजारपणाच्या काळात किती निरोगी व्यक्तींना बाधा केली, त्याला प्रसाराचा दर असे म्हणतात. 
 
संशोधनाची पार्श्‍वभूमी  
१ जानेवारी ते ५ मे पर्यंतच्या कोरोनाच्या आकडेवारीचा संशोधनासाठी विचार करण्यात आला.
ही आकडेवारी अधिकृत सरकारी संकेतस्थळावरुन घेण्यात आली. 
कोरोनाचा वाढता प्रसार बघता पुढील अंदाज येण्यासाठी शास्त्रीय संशोधनाला सुरवात.

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

संशोधनातील निष्कर्ष 
लॉकडाउनमध्ये कोरोनाच्या प्रसाराचा दर घटला. 
लॉकडाउन १ आणि २मध्ये कोरोना प्रसाराचा दर सरासरी १.२५८ असा होता. 
दरम्यान रुग्ण बरा होण्याचा दर ०.३६३ असा होता. 
सर्वाधिक प्रसाराचे अनुमानही तब्बल नऊ पटींनी कमी झाले. 
लॉकडाउन २ मधील प्रसाराचा दर स्थिर राहिल्यास ऑगस्ट २०२० पर्यंत देशातील दीड टक्के लोकसंख्या बाधित होईल. 
स्थिती अशीच नियंत्रणात राहिली, तर नोव्हेंबरअखेर कोरोना प्रसाराचा दर शून्याकडे जाईल. 
आधीच्या लॉकडाउनप्रमाने काळजी घेतल्यास देशातील जास्तीत जास्त ३० लाख लोकांना कोरोनाची बाधा होईल. 
महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांत इतर राज्यांच्या तुलनेत प्रसाराचा दर अधिक.

हे लक्षात घ्या 
कोरोनाच्या आधीच्या आकडेवारीवर केलेले हे संख्याशास्त्रीय विश्‍लेषण आहे. यामुळे भविष्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज येतो. योग्य खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाला याहीपेक्षा कमी वेळेत रोखू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com