पुणे : लॉकडाउनचे नियम शिथिल झाले अन् कोरोनाने दिवसभरात घेतले आतापर्यंतचे सर्वाधिक बळी!

Corona-Virus-Death
Corona-Virus-Death

पुणे : पुण्यातील बहुतांशी व्यवहार सुरू होऊनही चोवीस तासही उलटले नाहीत; तेच कोरोनाने इशारा देत, बुधवारी (ता.20) एका दिवसात 14 जणांचा जीव घेतला आहे.

कोरोनाचा धाक इतका मर्यादित न राहाता 165 रुग्णांची प्रकृती गंभीर केली असून, त्यातील 43 जण 'व्हेंटिलेटर'वर ठेवले गेले आहेत. एवढे सगळे झाल्यावर मात्र एक दिलासादायक बाब आहे, ती म्हणजे, दिवसभरात 113 रुग्णांनी कोरोनावर मात करीत आपले घर गाठले आहे. तर नव्या 152 रुग्णांची भर पडली आहे. 

दरम्यान, आतापर्यंत सर्वाधिक मृत्युची नोंद बुधवारी झाली आहे. याआधी एका दिवसात 13 बळी गेले होते. त्यामुळे पुण्यातील कोरोनाच्या बळींची संख्या आजघडीला 221 पर्यंत गेली आहे. महापालिका, खासगी आणि ससूनमधील रुग्ण मरण पावल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले.

या मृतांमध्ये सर्व रुग्ण 37, 40 आणि 50 पेक्षा अधिक वयाचे आहे. मृतांना कोरोनासोबत इतरही आजार असल्याचे उघड झाले आहे. अन्य आजारामुळे मृतांची संख्या वाढल्याचे कारण महापालिकेने दिले आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढल्याने पुणेकरांत समाधान होते. मात्र गेल्या पाच दिवसांत नवे रुग्ण आणि मृत वाढल्याने पुन्हा घबराट पसरली आहे. 

शहरात आतापर्यंत 35 शहर 302 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 3 हजार 899 जणांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील 2 हजार 23 रुग्ण ठणठणीत होऊन आपापल्या घरी परतले आहे. त्यात बुधवारी पुन्हा 113 जणांची भर पडली. तर आतापर्यंत 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत 3 हजार 899 पैकी 1 हजार 656 इतक्‍याच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या रोज दीड हजार लोकांच्या स्वॅब तपासण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचल्यानेच रुग्णांची संख्या वाढत आहे, असे महापालिका सांगत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

दरम्यान शहरातील बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील बहुतांशी व्यवहार बुधवारपासून सुरू झाले आहेत. त्यानंतरच्या काही तासांमध्ये नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com