
पुणे : ‘‘ऑपरेशन ‘सिंदूर’ ही केवळ भारतीय सैनिकांच्या शौर्याची कहाणी नसून स्वदेशी तंत्रज्ञान, धोरणात्मक दूरदृष्टी आणि स्वावलंबन यांचे द्योतक आहे. जवानांच्या पराक्रमाला अत्याधुनिक सेन्सर्स, मानवरहित ड्रोन, सुरक्षित संप्रेषण व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णय प्रणाली आणि अचूक शस्त्रास्त्रांची साथ लाभल्यामुळेच ही कारवाई ऐतिहासिक ठरली,’’ असे प्रतिपादन ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’चे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी केले.