तळेगाव ढमढेरे - आगामी काळात छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशी बांधील असलेल्या युवकांना राजकारणात संधी व राजकीय बळ देणार असून, युवकांनी समाजाभिमुख कर्तव्य बजावल्यास सर्वसामान्य जनता पाठीशी असते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार व पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.