लष्कर भरतीची पहेलवानांना संधी

भरती महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील उमेदवारांसाठी
Pune
PuneSakal

पुणे : मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या (कर्नाटक) बॉइज स्पोर्ट्स कंपनीतर्फे (Boys Sports Company) (बीएससी) (BSC) कुस्ती क्रीडा (Wrestling) विभागात मुलांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया २७ ते ३० सप्टेंबर (september) या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव (कर्नाटक) (Karnataka) येथे होणार आहे.

भरती प्रक्रिया महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील उमेदवारांसाठी होणार आहे. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि वयोमर्यादा ही ८ ते १४ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचे निकष शिथिल केले जाऊ शकतात. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशाचे प्रमाणपत्र जिल्हा स्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.

Pune
भारतीय क्रीडा प्राधिकरण करतेय विविध पदांची भरती !

भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय), क्रीडा वैद्यकीय केंद्र (एसएमसी) आणि बॉइज कंपनी ही निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या प्रक्रियेत जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी. निवडलेल्या उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय ‘एससएआय’मार्फत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल.

आवश्‍यक कागदपत्रे...

  • जन्म दाखला,

  • जात प्रमाणपत्र

  • शिक्षण दाखला, गुणपत्रिका, सरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला

  • तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली निवासी पत्त्याचे प्रमाणपत्र

  • दहा रंगीत छायाचित्रे व आधार कार्ड

  • जिल्हा, राज्य किंवा राष्ट्र पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com