

ट्रान्सजेंडर समुदायासाठी
ओरल प्रेप विषयावर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : येथील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष आणि निरामय आरोग्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने जेंडर अँड एम्पॉवरमेंट कार्यक्रमांतर्गत नवी पेठेतील निरामय आरोग्यधाम कार्यालयात एम.एस.एम. व ट्रान्सजेंडर समुदायासाठी ‘ओरल प्रेप’ या विषयावर प्रबोधन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डॉ. कविता चंडक यांनी ओरल प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिसविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शहरातील ३५ एम.एस.एम. व ट्रान्सजेंडर व्यक्तींनी सहभाग नोंदविला. सहभागींची वैद्यकीय तपासणी डॉ. क्षितिज भडंगे यांनी केली. एचआयव्ही, व्ही.डी.आर.एल., हिमोग्लोबिन व शुगर तपासणी व्यंकटेश कंची व प्रीती चौधरी यांनी केली. समुपदेशनाचे काम कल्पना गडगडे व संगीता जाधव यांनी पाहिले. परिचारिका नेहा जटला यांनी औषधांचे वितरण केले, तर जिया शेख, रमा गायकवाड व सुनीता पाटील यांनी नोंदणीची जबाबदारी पार पाडली.
निरामय आरोग्यधामचे प्रकल्प समन्वयक शिवाजी शिंदे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे ब्रँच मॅनेजर सुगतरत्न गायकवाड, कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी व फिल्ड को-ऑर्डिनेटर आकाश गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या निशा जगदीश, डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. एन. बी. तेली, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा सकट व निरामय आरोग्यधामच्या प्रकल्प प्रमुख सीमा कीणीकर व डॉ. भालचंद्र किणीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.